होय! मीच दिला नकार त्याला.....
मीच दिला नकार त्याला.....
कारण विट आला होता मला...
त्याच्या भित्रेपणाचा,
त्याच्या वासनेचा,
त्याच्या खोटेपणाचा....
होय! मीच नकार दिला त्याला...
कारण विट आला होता मला...
असं लपून-छपुन जगण्याचा,
चोरून प्रेम करण्याचा,
माझ्याच मनाला छळण्याचा ...
होय! मीच नकार दिला त्याला...
कारण विट आला होता मला...
त्याच्या ढोंगीपणाचा,
त्याच्या निर्बल मनाचा,
रोज-रोजच्या खुनाचा ....
कदाचित जगलंही असतं आमचं नातं,
पण चार भिंतीतच दडलं असतं...
समाजात वावरतांना ते आतल्या-आत रडलं असतं......
तो तर खुश असता, त्याला सगळच मिळतय म्हणुन...
मी मात्र रडत असते तो नातं आमचं टाळतोय म्हणुन...
म्हणुन मीच नकार दिला त्याला...
कारण, किती दिवस असं खोटं जग थाटायचं ??
जगण्याच्या नावाखाली रोज-रोज मरायचं ?
खोट्या संसाराच्या यज्ञात समिधा म्हणुन जळायचं ??
म्हणुन मीच दिला नकार त्याला
होय... मीच दिला नकार त्याला....
मीच दिला नकार त्याला....
मीच दिला नकार त्याला....
----प्रिया गवई