एकदा मला पाहाचय
तूला पाउसात भिजताना
तरसताना बघाचय
त्या बरसणार्या क्षणांना
असावी तू चिंब भिजलेली
ओल्या केसातूनी थेंबे ओघळलेली
ओला पदर थोडा सरावा बाजूवर,
अन काजळी गालावर ओघळलेली
व्हावे मीही थेंब एक कुणीसे
तुझ्या डोईवर पडून पायापर्यंत घसरावे
सुखावेल मीही तुझ्या ओलत्या स्पर्शाने
निथळारे रूप तुझे मनात साठवावे
असे पाऊसाने थैमान घालावे
मनाचे सारे बंध क्षणी कोसळावे
तूझ्या देहावरून ओघळण्यासाठी
जणू मग थेंब थेंब तरसावे
स्प्रर्श तुझे तन-मनी काहूरणारे
शब्द तूझे मल्हार छेडणारे
खूपव्यात कोसळणार्या जलधारा
जसे मदनाचे तीर रूतणारे
ओलते रुप घ्यावे बाहुत भरुनी
भारावते मन की गरज स्पर्शाची
बान्ध कसा घालु माझीया मनाला
वासना नव्हे ती ओढ मिलनाची
व्हावे फ़ूलांचेही अंतर
तेव्हा आपूल्या मिलनात
रक्तातून उसळावी प्रीत
श्वास मिळावीत श्वासात
दूर जवळ ते प्रश्न
उगा पडावेत कशाला ?
दोन शरीर एक जीव
बाकी उरावेत कशाला ?
author unknown