Author Topic: तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली.......,आज घरी दिसली............!  (Read 5341 times)

Offline prachidesai

 • Jr. Member
 • **
 • Posts: 117
 • Gender: Female
तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली,
थरथरत्या हातांनी त्यावरची आसवं पुसली,
एक आसू नेमका तिच्या नावावरच पडला,
नाव ख़राब होइल, म्हणुन पुसनारा हात अडला...,
दोन-चार थेम्बं तिच्या बापाच्या नावावरही पडली होती,
ज्याच्याकडे पदर पसरवून ,'ती' माझ्यासाठी रडली होती,
एक थेम्ब पडला तिथे, जिथे आप्तांची नावे दाटली होती,
बहुदा माझ्यासोबत फिरताना, तिला ह्यांचीच भीती वाटली होती.,
'आमच्या ताईच्या लग्नाला नक्की यायचे हं'..,यावरही एक थेम्ब पडला,'
ताई तू जा, मी नाही सांगणार कुणाला,..तो भाबडा बोल आठवला...,
काही घसरलेली आसवं, लग्नस्थळ दर्शवत होती,अगदी त्याच्याच समोर आमची भेटायची जागा होती,
'अहेर आनु नये' यावरही थोडा ओलावा होता,
तिच्या बर्थडे गिफ्ट साठी, मी मोबाइल विकला होता.......,
सगळी मित्रमंडळी माझ्यावर हसली.,
तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली.......,आज घरी दिसली............!

unknown

Marathi Kavita : मराठी कविताOffline SATYAVAN

 • Newbie
 • *
 • Posts: 11
chan  kharokhar........chan bhavana vyakta kelas...........i like it......yar

Offline pravin_dabhade

 • Newbie
 • *
 • Posts: 6
 • Gender: MaleOffline PRASAD NADKARNI

 • Jr. Member
 • **
 • Posts: 378
 • Gender: Male
 • Life:-a combination of adjustments & compromises