आस !
नसती उठाठेव मनाला,
उगाच का आस कुणाची,
ना आजची सकाळ झाली माझी,
अन ना उद्या होणार.....
ती येते दिवसासाठी,
अन जाते रात्रीसाठी...
पहाटे पहाटे आली,
अन हळूच कानात सांगून गेली,
बघ मी आले,
येताना ती आली,
दिवसभर थांबली,
थांबली ती "रात्रीची" वाट पाहण्यासाठी...
आज कळते आहे मला,
ती आहे दुसऱ्या कुणासाठी.....
niteen pund