भलतचं वेड लागलयं
तुला आठवुन जगायचं
आठवतयं का तुला हि
फक्त् एकदाच बघायचं
कधी काळी सगळं
मनासारखं घडायचं
मनाचं काय सांगावं
जे ठरलयं ते व्हायचयं
निदान तु खुष रहा
तुला मोठ्ठं व्हायचयं
मी आपला असाच बरा
आता माझं काय व्हायचयं
फक्त एकचं विनंती
पुन्हा नाही भेटायचं
सोसलयं सारं, बसं झालं
आता पुन्हा नाही सोसायचं
वेदना किती होतात
जाऊ दे, तुला काय कळायचं
चव त्याची कळायला
निदान,
एकदा तरी,
खरं प्रेम करायचं!
मैत्रयामोल!