Author Topic: देह माझा त्यागायचा म्हणतोय..!  (Read 899 times)

देह  माझा  त्यागायचा म्हणतोय

आजवर  जखमा झाल्यात ह्या देहाला
त्यांनाही पुसावं म्हणतोय

कसलीच नाती  नव्हती सोबती 
जेव्हा  यातनेत मी पोळत होतो

विचार केला मी  देह त्यागाचा

तेव्हा नेमका प्रेमात तुझ्या मी  पडलो

एक उजेड झाला आयुष्यात येण्याने  तुझ्या
क्षण प्रेमाचे  तू दाखविले

मग काही दिवस जगावं  वाटलं
आधारही  तुझा मज  वाटू लागला

तुझ्याही आयुष्यात तसा अंधारच होता
भेट आपली केली होती    दुखांनीच

जवळकी हि केली  होती एकांतानीच

होते  दु:ख एकच दोघांचे

प्रेम अन प्रेमाने  दिलेला  विरहच होता

तू आधार झालीस

अन..

मी  तुझा सोबती  बनलो

मग मेघांचा आवाज कडाडला
भूतकाळ तुझ्या डोळ्यांतून बरसला

सावरताना तुला मग मी ही गहिवरलो

तुला न दिसले

पण ..??

मी हि  रडलो

तुझ्याच साठी होते जगावयाचे मजला

म्हणुनी तर  तुझ्यात मी राहू लागलो

सुखी क्षणांना  ह्या होते
आयुष्यच छोटं

माझा अपघात हि  बनलं  कोडं

त्यागताना देह मी  होतो  तडफडलो

प्रेम तुझे  मज रोकत होते
त्या प्रेमाची परतफेड  मी कैसे करणार

आठवण बनून मग मी भेटू लागलो
स्वप्न तुझे अन अस्तित्व मी बनू लागलो

देवा कडे वेळ भेटावयास तुला  मागताना

तो हि खुशाल देऊ  लागला

अशी  हि आपली कहाणी प्रेमाची 
चार चौघांच्या ओठी येऊ लागली 

छोटी जरी  असली तरी
आज अमरत्व  गाठू लागली ...!!
-
© प्रशांत शिंदे