Author Topic: तु ये ना स्वप्नांत..!  (Read 1393 times)

तु ये ना स्वप्नांत..!
« on: September 08, 2012, 03:46:03 PM »
तु ये ना स्वप्नांत
तुझी वाट मी पाहतो

जसे तु रोज यायची

थोडा वेळ थांबेल सांगुन

बोलत सकाळ करायची

आजही डोळे मिटावेसे वाटतात

तुझी आस आजही तशीच आहे

गुंतलंय हे मन तुझ्यात

भरकटलोय अंधारात त्या

तु जिथुन गेलीस

तुला शोधताना भावनांनी

आता जखमा करुन घेतल्यात
 
त्यांना प्रेमाने स्पर्श करावयास ये

तु ये ना स्वप्नांत
मी आजही डोळे मिटलेत..

श्वासही थांबेल सखे
स्पंदनांना ऐकावयास ये

नकारुन मज गेली होती
तेव्हा कहर वेदनांनी केला
तुझ्या त्या प्रेमळ शब्दांनी
प्राण ही हातात घेतला

बघ मला मी एकटेच पडलो आहे
तु माझा देह पहावयास ये
अश्रूंनी भिजलेलं ते फुल घेउन ये

मी आजही डोळे मिटलेत..

तु ये ना स्वप्नांत...!

-
© प्रशांत शिंदे


(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

Marathi Kavita : मराठी कविता