Author Topic: कसे गं तुला समजाऊ..!  (Read 1958 times)

कसे गं तुला समजाऊ..!
« on: September 15, 2012, 01:48:20 PM »
कसे  गं तुला समजाऊ ..

तुझ्यावर एवढे प्रेम केले मी

तुझ्यासाठीच जगलो

तुझ्याच स्वप्नांत जाण्यास

तारयांसोबत भांडलो मी

कारण भेट आपली

हया तारयांनीच घडवली

अन..

त्या तारयांना उजेडात झाकुन
नाहीसे केले तू

कसे गं समजाऊ तुला..

तु किती चुकलीस

तुझ्या जवळच्या विहीरीला सोडुन

सागराची व्हायला गेलीस

कसे तुला समजले नाही

तो सागर तुला डुबवुन टाकणार

विहीर भोळी तीच  तृष्ण भागवणार..

कसे गं तुला समजाऊ..

खरे प्रेम आपल्या जवळपासच असतं

पण ..

तयास ठेचाळुन दु:खास आपले करतो..

कसे गं तुला समजत नाही

मी आजही तुलाच प्रेम करतो....

-
© प्रशांत शिंदे

(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

 

Marathi Kavita : मराठी कविता