Author Topic: अंतर वाढलंय तुझ्यात अन माझ्यात !  (Read 2056 times)

अंतर वाढलंय तुझ्यात अन माझ्यात
 
 तु आता दुर राहतेस
 तरी तुझी आठवण येते
 
चाफा फुललाय मला भेटलाही
 पण सुगंध देणं मात्र विसरलाय
 कारण ते तर तुझ्यासाठी होतं
 
 खरंच शोना..
 
 तुझी आठवण  सारखी येते
 पण तुला  सांगता येत नाही
 कारण ..??
 ही रात्र पहील्यासारखी थांबत नाही
 तुझी वाट पाहण्याची सवय
 हया चंद्राने मात्र सोडलीय
 हो माझे आजही तसेच आहे
 जागतोय रात्री तरी
 डोळे मात्र उघडेच आहेत..
 
 अंतर खरच वाढलंय ..!
 
 कारण तु आज सासरच्या दारात आहेस
 अन मी मरणाच्या
 
 तुला कधीच जाणवणार नाही
 मी कधी गेलोय
 
 हो पण नक्कीच वेळ येईल अशी
 कळेल तुलाही मी मेलोय..
 
 अंतर खुप वाढलंय..
 
 मी फक्त आठवण बनुन राहीलोय
 तु नाही पण  मित्रांनी अश्रु वाहीलेत
 मी तर हतबल झालो मी येउ शकत नाही
 
 पुन्हा जगावं वाटतं
 पण..
 तो देह आता माझा वाटत नाही
 
 अंतर खुप वाढलंय.. !
-© प्रशांत शिंदे

« Last Edit: September 21, 2012, 11:15:39 AM by प्रशांत दादाराव शिंदे »