Author Topic: पहिले प्रेम कधीच विसरायचे नसतं ...!  (Read 1494 times)

असेच करायचे असतं...!

असेच करायचे असतं
आपल्याला  अश्रू मिळाले  तरी चालेल 
पण ...??
तिच्या  मुखावर हसू आणायचे असतं ..
असेच करायचे असतं..
ती आपली झाली नाही तरी
तिला  आपलेच मानायचे असतं
तिच्या आठवणी  पुस्तकात लिहून 
त्याचा  एक  एक पान  चाळायचे असतं ....

असेच करायचे असतं ...!

आहे  जरा  वेडा मी
जे  तुझ्यात गुंतून बसलोय
तुझ्या सहवासातला  प्रत्येक   क्षण तो
मी एकट्यात आठवत बसलोय
पहिले प्रेम आहे हे  जे कधीच  विसरायचे नसतं ...

असेच करायचे असतं ... !
-
© प्रशांत शिंदे