Author Topic: पाहीलंय मी तिला ..!  (Read 1221 times)

पाहीलंय मी तिला ..!
« on: October 19, 2012, 07:53:54 PM »
पाहीलंय मी किनारयाला
किनारयास भेटणारया त्या क्षारांच्या लाटांना..

पाहीलंय मी वाट पाहणारया त्या तुझ्या नयनांना..

पाहीलंय आज सुकलेल्या त्या
दगडांना

जिथे बसुन तु काही तरी लिहायची

पाहीलंय मी त्या तुझ्या स्पंदनांना

ऐकलंय मी  येणारया हुंदक्यांना

वादळ बनलेल्या त्या तुझ्या विचारांना

पाहीलंय मी एकटं पडलेल्या त्या पाखराला

संपलेल्या त्या तुझ्या प्रेमाला

पाहीलंय मी तुला
माझी असुनही दुसरयाची होताना

पाहीलंय मी त्या दिलेल्या फुलाला रडताना.....
-
© प्रशांत शिंदे

१९/१०/२०१२

(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे
« Last Edit: November 23, 2012, 10:56:44 AM by प्रशांत दादाराव शिंदे »

Marathi Kavita : मराठी कविता