Author Topic: अखेरची भेट आमची अखेरचीच ठरली ...!  (Read 1759 times)

ती भेटली  मला त्या दिवशी
अन मी हि  तिला भेटलो
 तिची माझी भेट  तशी पहिलीच होती
त्या दिवशी  तिच्यासाठी मी  मित्र
अन माझ्यासाठी ती प्रेयसी झाली
मन जडले तिच्यावर 
अन प्रेमात तिच्या मी पडलो


मग  काही दिवसांत
दोघांत  भांडण होऊ लागली 
काही न काही कारण घेऊन ती चिडायला लागली
 एक दिवस असा आला मला सोडून  ती  गेली
खूप  खचलो होतो तिच्या जाण्याने
हृदय हि तुटले माझे  तिच्या गेल्याने


दिवसाचे काय ते तर  तसेच जायचे
तिला आठवत अन डोळे पाणावत


मग काही दिवसाने  आमची
अशी काही भेट झाली


ती  एकटी  अन मी  हि एकटाच होतो
फक्त ती आणि  मी  दुसरे कुणाचाच तिथे भास नव्हता


रडली  ती खूप 
पण मी  काहीच करू नाही शकलो
माझ्याशी  तिला काही  बोलायचे होते
पण बोलू न शकली  ती


ती  रडत होती मला पाहून
पण  फरक  एवढा होता
ती माझ्या देहावर रडत होती
अन  देहाच्या बाहेरून  ....


अखेरची भेट आमची अखेरचीच  ठरली ...!
-
© प्रशांत शिंदे


(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे   

 
 
   
« Last Edit: October 26, 2012, 01:18:14 PM by प्रशांत दादाराव शिंदे »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline कवि - विजय सुर्यवंशी.

  • Jr. Member
  • **
  • Posts: 478
  • Gender: Male
  • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
hruday sparshi kavyarachana..