Author Topic: $$ हद्दपार $$  (Read 418 times)

Offline विजय वाठोरे सरसमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • विजय वाठोरे सरसमकर
$$ हद्दपार $$
« on: June 27, 2015, 06:33:29 PM »
 $$  हद्दपार  $$

जर रडवायचच होत
तर हसवलस का मला ?
साथ असूनही आहेस दूर
मग जवळ आलीस कश्याला ?

तू अनोळख्या सारखी बघतेस
मग का दिली होतीस ओळख मला ?
तुझ्या हृदयस्पर्शी नयनांनी 
प्रेमात फ़सवलस का मला ?

शपथांच्या गुंत्यात गुंतवून
का तोडलंस त्या शपथांना ?
स्वप्नाविलासी भावनात रंगवून
का खेळ मांडला त्या भावनांचा ?

तुझ्या स्पर्शान वेडावून 
का बेभान केलास मला ?
माझ्या प्रीतीच्या प्रेमापाखरा म्हणून
आयुष्यातून तुझ्या का हद्दपार केलस मला ?

                   विजय वाठोरे सरसमकर
                   ता.हिमायतनगर जि.नांदेड
                     9975593359

Marathi Kavita : मराठी कविता