Author Topic: ''निशब्द''  (Read 1166 times)

Offline SHASHIKANT SHANDILE

  • Jr. Member
  • **
  • Posts: 349
  • Gender: Male
  • शशिकांत शांडिले, नागपुर
''निशब्द''
« on: January 07, 2015, 02:25:37 PM »
शेवट शेवट कधीरे माझा थकलो या जगण्याला
शब्द संपले ओठांवरती मग निशब्द असा मन झाला

या जीवनाच्या घटीत  गोष्टी आठवण मज येता
डोळ्यांमधुनी अश्रू थिपकले मन आजही भरून आला
शब्द संपले आवडीचे मग निशब्द असा मन झाला

आजवरी मी लिहित आलो स्वप्न शब्द मनाचे
त्या शब्दातुनी व्यक्त होणारा प्रेम या जीवनाचा
शब्द संपले लिहिण्याचे मग निशब्द असा मन झाला

प्रेम करता करता जीवन संपून जावे
जीवनामध्ये उणीव तिची सदाच रडवित राहे
शब्द संपले आठ्वणींचे मग निशब्द असा मन झाला

शेवट शेवट कधीरे माझा थकलो या जगण्याला
शब्द संपले जीवनातले  मग निशब्द असा मन झाला
                           मग निशब्द असा मन झाला

शशिकांत शांडीले (SD), नागपूर 

Its Just My Word's

शब्द माझे!

Marathi Kavita : मराठी कविता