Author Topic: बाळा'साहेब'  (Read 1609 times)

Offline किरण पवार

 • Newbie
 • *
 • Posts: 24
 • Gender: Male
  • http://kiranpawar0108.wordpress.com/
बाळा'साहेब'
« on: November 18, 2012, 11:52:12 PM »

बाळासाहेब तुम्ही ‘सोडून’ गेलात
अजूनही विश्वास बसत नाही
पेटून उठणारा माझा ’वाघ’ का आज
डरकाळ्या फोडताना दिसत नाही..
 
आम्ही सगळे तुमचे मावळे
अन तुम्ही आमचे राजे होता
तुमचा आवाज म्हणजे आमची स्फूर्ती
असे ‘दैवत’ सगळ्यांचे होतात
 
आता कोण फिरवेल पाठीवरून मायेचा हात,
अन कोण ताठ मानेने जगायला शिकवेल
कोण वेळेस ओरडून वडिलकीने
आम्हाला दूर दूरदृष्टीने बघायला शिकवेल..
 
डोळ्यात अश्रू ठेवून आज निघून गेलात
आता आम्ही कुणाकडे बघायचे
आता फक्त एकाच ध्यास
तुमचाच आदर्शावर पुढे जगायचे..
 
प्रत्येक कडवा शिवसैनिक
मनात हेच बोलत असेल,
तुमचा असंख्य आठवणी घेऊन
शिवतीर्था कडे चालत असेल
 
जर कुठे चमत्कार असता
तर तुमचे ‘परत येणे’ मागितले असते
भले मग आमचे हजारो प्राण
यमाला त्या बदल्यात दिले असते..
 
तुम्ही आमच्या हृदयात
सदैव साठून राहाल..
अनावर झाल्या क्षणी
डोळ्यातून अश्रू बनून वाहाल..
 
आता फक्त एकच इच्छा
आम्ही मरेपर्यंत तुमची स्मृती या हृदयात जागावी..
आई जगदंबे चरणी प्रार्थना
तुमचा आत्म्यास शांती लाभावी..
 
- किरण पवार
(तुमचा एक शिवसैनिक)

http://kiranpawar0108.wordpress.com/

 :(
« Last Edit: November 18, 2012, 11:53:00 PM by किरण पवार »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: बाळा'साहेब'
« Reply #1 on: November 19, 2012, 01:00:18 PM »
khare hindu ridhay samraat

Offline किरण पवार

 • Newbie
 • *
 • Posts: 24
 • Gender: Male
  • http://kiranpawar0108.wordpress.com/
Re: बाळा'साहेब'
« Reply #2 on: November 24, 2012, 12:13:47 PM »
hoy.. saheb have hote..