Author Topic: तू परत ये ...... ताई ........ :'(  (Read 1582 times)

तू परत ये ...... ताई ........ :'(
« on: September 12, 2013, 10:51:30 AM »
एका   मुलाची ताई त्याला सोडून देवाघरी जाते तिच्या  आठवणीत लिहलेली  कविता :

कुठे  निघून गेलीस तू
मला  एकट्यात सोडून
शोधायचे कुठे तुला मी
आता पडलो आहे मी  मोडून ........

खरच का  ?
इतका राग आला तुला
मला  न  सांगताच निघून गेलीस
आठवणींचा दिवा  तुझ्या
माझ्या मनात  उज्वलित करून गेलीस .........

रक्षाबंधनाची  तुझी राखी हाताला
आज हि तशीच बिलगून आहे 
तूच म्हणालीस ना  भाऊबिजेला
तुला खूप काही सांगायचंय............

आठवण खूप येते
तुला  विसरताही येणार नाही
तुझ्यासारखी ताई   खरेच दुसरे कुणी नाही .......

आली बघ दिवाळी
तु ही  आता निघून ये
कधीच  गं रागावणार नाही तुझ्यावर
राग सोडून  परत  ये ................

ताई  तू परत  ये .............. :'(
-
© प्रशांत डी शिंदे

Marathi Kavita : मराठी कविता


Nandkishor Pathak

  • Guest
Re: तू परत ये ...... ताई ........ :'(
« Reply #1 on: June 14, 2014, 10:29:41 AM »
 ::)Super khupach emotional touchig...

Re: तू परत ये ...... ताई ........ :'(
« Reply #2 on: July 30, 2014, 04:52:39 PM »
::)Super khupach emotional touchig...
dhanyvad nandkishorji ..