Author Topic: "अझून का बरं ती नाही आली,..!"© चारुदत्त अघोर  (Read 1416 times)

Offline charudutta_090

 • Jr. Member
 • **
 • Posts: 185
 • Gender: Male
 • A fall leaf of autumn,....!!
ॐ साईं.
"अझून का बरं ती नाही आली,..!"© चारुदत्त अघोर(१२/७/११)
आज मन विचलित झालं,कारण झोप नाही झाली,
आज चित्त दुभंगलं कारण,कारण कविता नाही केली..!
नुसत्या त्या क्षणांची आठवण,पुरे नाही झाली;
आज मन अस्थिर झाले,अझून का बरं ती… नाही आली,..!

नुसतं शुष्क सगळीकडे,कारण श्रावण सर नाही आली,
अगदी रिकामं मन झालं,कारण शब्दास भर नाही आली,
झाकोळ जरा भरून आलं,गगनी वीज कडाडून गेली;
आज मन अस्थिर झाले,अझून का बरं ती… नाही आली,..!

नुसती नजर भिरकावत होती,कारण सावली जवळून गेली,
आभाळी शेंदरी किनार चढली,कारण दुपार, मावळून गेली;
थोडी आशा सांजवत होती,कारण वेळ टळती झाली ;
आज मन अस्थिर झाले,अझून का बरं ती… नाही आली,..!

वाट पहायची हद्द जरा, जास्तीच वेडावून गेली,
एक हवेची झुळूक थोडी,केशी लाडावून गेली;
क्षितिजी सूर्य अस्तावत होता,पण रात्र ती नाही झाली;
आज मन अस्थिर झाले,अझून का बरं ती…. नाही आली,..!

एकट मन पोखरत होतं,कारण दुकटवणारी नाही आली,
एकाच विचारी स्थिर होतं,कारण भटकावणारी नाही आली;
पापण कडा सुकून गेल्या,कारण ओल कुठे नाही आली, 
आज मन अस्थिर झाले,अझून का बरं ती… नाही आली,..!

संध्या छायी काळ्वत होती,पण आभाळी चांदणी नाही आली,
बसून अशावत सुनावलो,कारण मिठी कोंदणी नाही झाली;
गवती दव थेम्बावले,पण मन-माती भिजण, नाही जाहली;
आज मन अस्थिर झाले,अझून का बरं ती.... नाही आली,..!
चारुदत्त अघोर(१२/७/११) 
 
   


Marathi Kavita : मराठी कविता


Offline Gaurav Patil

 • Jr. Member
 • **
 • Posts: 73
 • Gender: Male
 • अस्तित्वाला हजार नावे देतो... परी नाव ठेववत नाही.....
  • Gaurav's galaxy

Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
एकदम झक्कास....लई भारि.......