Author Topic: " बहरात आसंवांचे, किती पुर वाहिलेले..."  (Read 593 times)

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

  • Jr. Member
  • **
  • Posts: 478
  • Gender: Male
  • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
" बहरात आसंवांचे, किती पुर वाहिलेले...".
     
        डोळे भरुन जेंव्हा, तिन्हीसांज ये घराला,
        मी हे कसे, घराचे , दार लावलेले....??
        बहरात आसंवांचे, किती पुर वाहिलेले..॥.

      वचनात त्या फुलांच्या, हा जीव गुंतलेला,
      क्षितिजावरी अजुनी, ते रंग सांडलेले....
      बहरात आसंवांचे, किती पुर वाहिलेले..॥.
     
      भेटित आपुल्या त्या, फुलपाखरे उडाली
      काट्यांसही न रुचले, ते पंख छाटलेले.....
      बहरात आसंवांचे, किती पुर वाहिलेले..॥.
   
      तारा सुरेल जुळल्या, गाणे सुरात न्हाले
      अंगार वेदनेचे, आतुन पेटलेले....
      बहरात आसंवांचे, किती पुर वाहिलेले..॥.

      हुंकार यौवनांचे, फुलले नव्या नव्याने
      झंकार या तमाचे, आखिव बेतलेले....
      बहरात आसंवांचे, किती पुर वाहिलेले..॥.

      घालित शीळ आता, येथे येतो वसंत
      जाता निघुन त्याने, मजलाच टाळलेले
      बहरात आसंवांचे, किती पुर वाहिलेले..॥.....