Author Topic: "माझ्या स्वप्नातली परी"  (Read 580 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 232
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
****माझ्या स्वप्नातली परी****

माझ्या स्वप्नातली परी,
आयुष्यात आली खरी..
काय सांगू तिची माधुरी,
माझ्या स्वप्नातली परी..!!

आयुष्याच्या या वाटेवर,
स्वप्ने पडली होती बरीच..
पण ज्या स्वप्नात स्वर्गसुख,
त्यात माझ्या स्वप्नातली परी..!!

काय सांगू मी तिच्याबद्दल,
सौंदर्याची ती एक होती परी..
नेहमी प्रेमजादु तिच्या जुबाणी,
अशी माझ्या स्वप्नातली परी..!!

ती म्हणजे स्वर्गातली सुंदर परी,
ती म्हणजे दैवलोकातली नटरंगी नारी..
ती म्हणजे समुद्रातली गोड जलपरी,
ती म्हणजेच माझ्या स्वप्नातली परी..!!

आली होती जीवनात माझ्या,
म्हणायची मी प्रेमवेड्याची परी..
शोन्या मी फक्त तुझीच आहे रे,
मी तर तुझ्याच स्वप्नातली परी..!!

दृष्ट लागावी अशी जोडी आमची,
होती या प्रेमवेड्याची ती परी..
तिच्या सोबतच जीवन माझं,
अशी माझ्या स्वप्नातली परी..!!

आयुष्य अगदी सोन्यासारखं होतं,
स्वप्ने वाटू लागली होती आता खरी..
पण का कुणास ठाऊक काय झालं,
अचानक दुरावली ती माझी परी..!!

तोडून टाकलं तिनं आमचं नातं,
मी किती विनवण्या केल्या तरी..
कारण तर काहीच नव्हतं पण,
तरी हरवली माझ्या स्वप्नातली परी..!!

ती होतीच स्वप्नातली परी,
पुन्हा एक स्वप्न दाखवून गेली..
अन् माझ्या स्वप्नातली परी,
आता फक्त स्वप्नातच राहिली...!!!
-
स्वलिखीत...
प्रेमवेडा राजकुमार
9970679949