Author Topic: " वडीलांस पत्र ..........."  (Read 813 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
" वडीलांस पत्र ..........."
« on: July 11, 2015, 01:50:28 PM »

" वडीलांस पत्र ..........."
.
प्रिय " बाबा " यांस ,
आज थोडं एकट एकट वाटलं,
बाकी काही
नाही,तुमची आठवण
आली म्हणून
जरा बोलावसं वाटलं……
चालायला लागल्यावर तुम्हीच
पहिला हात
दिला होतात,
पण मी पुढे गेल्यावर नकळतच कधी
दूर गेला
होतात,
आज, स्वतःच्या पायावर उभा असलो
तरी
धडपडल्यासारखं वाटलं.
बाकी काही
नाही,तुमची आठवण
आली म्हणून
जरा बोलावसं वाटलं……
जेवताना काऊ चिऊ शिवाय कधी
घास
पोटात गेला नाही,
आता तर चिऊ बघायला सुद्धा मिळत
नाही,
काऊ चिऊ साठी पुन्हा एकदा
रुसवासं वाटलं.
बाकी काही
नाही,तुमची आठवण
आली म्हणून
जरा बोलावसं वाटलं……
लहानपणी तुमच्यासोबत पावसात
भिजताना
खूप मजा वाटायची,
फाटका रेनकोट , तुटकी
छत्री असूनही ती
दोघांना पुरायची,
आज , नवी कोरी छत्री
असूनही पावसात थोडं
भिजावस वाटलं.
बाकी काही
नाही,तुमची आठवण
आली म्हणून
जरा बोलावसं वाटलं……
एकदा घरात एकटा असताना, सर्व घर रडून
डोक्यावर घेतलं होत,
पण तुम्ही धावत पळत येउन ' मी
आहे 'असं
सांगितलं होत,
आज , स्टेशनच्या गर्दीत सुद्धा " एकट
एकट "
वाटलं .
बाकी काही
नाही,तुमची आठवण
आली म्हणून
जरा बोलावसं वाटलं……
आठवतय… एकदा मी पडलो
होतो,मला खूप
लागलं होत ,
त्यादिवशी तर पूर्ण आभाळ तुमच्या
डोळ्यात
दाटलं होत,
आज , उगाचंच अडखळून पडावसं वाटलं…
बाकी काही
नाही,तुमची आठवण
आली म्हणून
जरा बोलावसं वाटलं……
रात्री झोपताना तर तुमची
मांडीच माझी "
उशी " असायची ,
तुम्ही नसताना आईच्या
कुशीतही झोप
नसायची,
आज , पुन्हा एकदा तुमच्या जवळ झोपावं
वाटलं….
बाकी काही
नाही,तुमची आठवण
आली म्हणून
जरा बोलावसं वाटलं……
तुमचा हात सोडून शाळेत जाणे नकोसे
वाटायचे,
पण तोच हात पकडून घरी जाताना
मात्र कसलेच
भान नसायचे,
आता मोठा झालो तरी " तो "
हात पकडून
शाळेत जावंसं वाटलं…
बाकी काही
नाही,तुमची आठवण
आली म्हणून
जरा बोलावसं वाटलं……
तुमची आठवण मनातून कधीच
जाऊ शकली नाही,
आज , भरलेल्या आभाळाबरोबर डोळ्यात
पाणी
दाटल्यासारखं वाटलं….
बाकी काही
नाही,तुमची आठवण
आली म्हणून
थोडसं रडावसं वाटलं……
बाकी काही
नाही,तुमची आठवण
आली म्हणून
थोडसं रडावसं वाटलं……! :'(
 .
 Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref
« Last Edit: July 11, 2015, 01:53:18 PM by Prem Mandale »

Marathi Kavita : मराठी कविता


Namrata VINOD KAMBLI

  • Guest
Re: " वडीलांस पत्र ..........."
« Reply #1 on: July 12, 2015, 10:50:49 PM »
far sunder kavita I miss my father very much......love u baba