स्मृती.......... (गझल)
बरसून या सरींनी, केले मना या खुळे,
फुलला शिवार हा सारा, भरले हे तळे....
फुलला गुलाब रानी, त्यास मिळे न पाणी,
खुडण्या हजारहात , नाही राखाया कोणी......
आला कुठून वात, उडवीत हा धुराळा,
जमवीत पर्णराशी, कुठे चालला हा भोळा........
करुनी नभास गोळा, पाडे किती त्या धारा,
झाली धरा ही ओली, फुलवी बघा शिवारा.......
भरती आटून गेली, झाला रिता किनारा,
उघड्यावरी तो पक्षी, नाही त्यास निवारा.........
आठ्व तुझा ग साजणी, आणि डोळ्यांत पाणी,
विसरलीस मजला, ठेवून स्मृती या जीवनी.........
दिगंबर.........