Author Topic: [*आजचा पाऊस जरा वेगळाच होता * (The Orignal Love Story) ...  (Read 574 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
[*आजचा पाऊस जरा वेगळाच होता *
(The Orignal Love Story)
 Part 1
.
आज सकाळी नेहमी प्रमाने उठलो
सकाळची काम लवकर उरकत होतो
गायीच दुध काढुन झाल आणि
आंघोळीला गेलो
बाहेर आलो तर बघतो मस्त
पाऊसाच वातावरण झाल होत
आणि मला पाऊस खुप आवडतो
कारण तिच्या आठवणीत पाऊसात एकटयाने भिजण्याची मजाच खुप वेगळी असते …
आज म्हणटलं चला बाहेर कुठ तरी जाऊ पाऊसात मनसोक्त भिजु …
कारण आज शेतात पण कही काम नव्हती …
म्हणुन पटकन मी माझी गाडी साफ
केली …
पण तेवढ्यात काकांनी आवाज़ दिला ...
Prem इकड ये आज कुठ जावु नको द्राकक्षाची डिपींग करायची आहे लवकर शेतात जा पाऊस यायच्या आत …
राग आला काकांचा पण काय करणार …
गाडी घेतली आणि निघालो शेताकडे
गाडी फार्म हाऊस वर लावली ..
आणि गेलो द्राक्षाच्या  बागेत …
पण तेवढ्यात पाउस सुरू  झाला
आता पाऊस सुरु झाला तर मी कसला काम करतो …
खुप जोरात वारा सुटला आणि
मी पळत फार्म हाऊस कडे निघालो …
खुप जोरात पाऊस चालु होता …
सगळीकडे पाणीच पाणी झाल …
एकदम शांत पाऊस पडतोय छान
गार वारा सुटराय …
अशात Saru ची खुप आठवण येत
होती …
डोळ्यांतुन गरम गरम पाणी येत होत …
आज ति माझ्यासोबत असती तर
खुप भिजलो असतो तिच्यासोबत पाऊसात …
पण ते  शक्य नव्हत …
कारण ति मुंबई ला मी नाशिकला …
मंग कशी असणार जवळ पण मनाने मात्र आम्ही कायम जवळ आहोत …
दोघांनच एकमेकांनवर जिवापाड
प्रेम आहे …
असाच तिच्या आठवणीत बुडालेला होतो …
पण अचानक मोबाइल वाजला .
आणि मी भानावर आलो…
काकांचा Call होता …
कुठ आहेस रे घरी ये आता ..
मी .. हो आलोच काका ..
गाडी जवळ आलो तर बघीतलं एवढया पाऊसात गाडी नाही जाउ शकत ...
म्हणटलं चला पायी जाऊ पाऊसात भिजत भिजत …
निघालो घराकडे मंग हळूहळू …
रसत्यावर आलो मुंबई to आगरा हायवे वर …
तेवढ्यात एक बस आली …
त्यांच्यातुन College चे पोर पोरी
उतरत होते …
माझा लहान भाऊ पण होता आणि मी बघुन चकित झालो …
एका मुलीच्या गळ्यात हात टाकुन उतरत होता …
मी थोड़ा साइटला झालो कारण मी त्याला पाहील होत त्याने नव्हत मला पाहील …
मस्त तिच्या गळ्यात हात टाकुन रसता पार करत होता …
आणि मी अचानक समोर गेलो त्याने मला बघताच हात काढून घेतला … आणि तिला दुर केल …
खुप घाबरलेला होता तो ...
मी दोघांना पण आवाज़ दिला... ईकडे या रे … दोघ पण माझ्यासमोर एका अपराध्यासारखे
ऊभे राहीले ..
तो ..... भाऊ ही माझी …
मी ... बस बस काही सांगायची गरज नाही ...
आणि तो रडायला लागला आणि त्याला रडतानी बघुन ति पण रडायला लागली …
मी दोघांना जवळ घेतले …
रडु नका रे मी आहे ना दोघानी जोरात मिठी मारली मला …
बस बस आता रडु नका नाहीतर दोघांना पण मारील मी मंग दोघ पण थोडे हसले …
मी .... चला जा आता घरी पाऊस चालु आहे आजरी पडशाल दोघे पण …
आणि मी माझ्या आंगातला कोट काढुन त्यांच्यावर टाकला …
जा आता निघा हळूहळू घरी …
तो.... भाऊ तु नाही येणार का घरी …
मी ... नाही मला थोड काम आहे मी येतो नंतर …
तो .... भाऊ वहीनी ची आठवण येतेय ना तुला …
मी .... hmmmmm
चल जा आता तु घरी लवकर सगळे वाट बघत असतील …
आणि ते दोघे निघाले खुप दुर पर्यंत मी त्यांच्याकडे बघत होतो …
कारण मला त्यांना बघुन Saru ची खुप आठवण येत होती …
ति जवळ असती तर आम्ही पण असच पाऊसात भिजत चालो असतो …
"ये पिल्या आज खरच ग तुझी खुप आठवण येतेय :'( "
असाच पाऊसात ऊभा राहुन रडत होतो …
तेवढ्यात कुणी तरी मांगुन आवाज दिला  … " ये वेड्या एकटाच का भिजतोय "....
आवाज मुलीचा होता मागे वळून बघितले तर खरच मुलगी होती …
हाता मधी छत्री
सफेद पंजाबी ड्रेस एकदम साधी सिंपल  …
पण ओळखीची नव्हती …
ति जवळ आली आणि माझ्यावर छत्री धरली … मी म्हणटल हे उपकार कशा बद्दल
.....
ति… उपकार नाही तु ओला होत आहे म्हणुन …
मी… मला आवडत म्हणुन भिजतोय …
ति....नाव काय तुझ
मी … Prem
ति… खुप छान नाव आहे तुझ .
मी … धन्यवाद… आणि तुझ काय
ति … काजल .... पण तु एकटाच का भिजतोय पाऊसात …
मी  … का एकट भिजु शकत नाही का …
ति … तस नाही पण सगळे Gf सोबत भिजताना तुला नाही का Gf ....
मी.... आहे ना (ति थोडी नाराज झाली)
ति... कुठ आहे मंग ति …
मी… ति मुंबई ला आहे
ति … (चकित होवून) काय अस कस तु नाशिकला ति मुंबईला …
.
Part 2 Next  :-)

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):