Author Topic: मिठीत मृत्यू प्रियाच्या... (फोटो पाहून सुचलेली कविता...)  (Read 1026 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550

pl visit my blog to see photo
(मित्रवर्य प्रकाश रेडगावकरांनी सहज विचारलेल्या कवितेवरील फोटोच्या प्रश्नाने ही जुनी कविता आठवली ती पोस्ट करीत आहे )

मिठीत जगणे होते
मिठीत मरण आले
हाती जपायचे होते
हातीच सारे संपले

मोडुनी घर पडले
स्वप्न मातीत संपले
स्वप्नांतील पाखरांचे
पंख धुळीत मिटले

कसला खेळ असे हा
रे कोण खेळतो क्रूर 
विझलेले श्वास तप्त
थिजला वेदना पूर

देहाचा कोट भेदुनी
कृतांत गेला घेवूनी
एका फुलल्या बागेचा
क्षणी पाचोळा करुनी
 
मिठीत मृत्यू प्रियाच्या
भाग्य असते कुणाचे
परि असह्य भीषण 
का वरदान शापाचे
 
मिठीत गेल्या युगुला
नकळे काय वदावे
करी प्रार्थना प्रभुला
असे कुणा न न्यावे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/