Author Topic: सख्या ये आता... (“नटरंग” या चित्रपटातील “खेळ मांडला”या गीतावर आधारित.)  (Read 1854 times)

Offline बाळासाहेब तानवडे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 160
  • Gender: Male
  • जगा आणि जगू द्या...

सख्या ये आता...
(“नटरंग”  या चित्रपटातील “खेळ मांडला”या गीतावर आधारित.)

वाट किती पाहू डोळा झोप येत नाही.
कुस किती बदलू मी आई जागी होई.
 
विचारी ती पुन्हापुन्हा झोप का ग नाही.
माझिया मनाची स्थिती काय सांगू बाई.
तुझ्या वाचून रे सख्या,क्षण युग आता.
लवकर ये रे आता.
सख्या ये आता.... ये आता …. ये आता....(२  वेळा)
सख्या ये आता.... ये.... सख्या ये आता
 
सोडून तु गेला मला,छोटा माझा रे गुन्हा.
मागेन मी माफी ,चूक होणार रे ना पुन्हा.
कोणासाठी जगू इथे, खुप दूर तु गेला.
दूर जाता एक याद का रे आली ना तुला.
 
काळ खुप लोटला ग बाई, निरोप तुझा रे नाही.
येशील का फिरून माघारी, सख्या तु रे मुरारी.
ये रे ये येरे आता ,बघू नको अंत रे.
आसवांच्या वाहण्याला मिळू दे उसंत रे.
तुझ्या वाचून रे मला माझी ना ओळख.
कोणा सांगू माझी ही व्यथा.
सख्या ये आता.... ये आता .. ये आता....


गीतकार: बाळासाहेब  तानवडे
© बाळासाहेब तानवडे – १४/०२/२०११
http://marathikavitablt.blogspot.com/


VDO
सख्या ये आता .
« Last Edit: February 17, 2011, 01:59:40 AM by बाळासाहेब तानवडे »