Author Topic: दिवस जात नाही (कवी - कल्पेश देवरे)  (Read 1274 times)

Offline Kalpesh Deore

  • Jr. Member
  • **
  • Posts: 88
  • Gender: Maleदिवस जात नाही


तुझी आठवण आल्याशिवाय दिवस जात नाही
आणि भारावलेल्या मनाला तूच दिसत नाही


मनाच्या गाभाऱ्यात आठवणींचे हुंदके तुझे
सळसळत्या वाटेवर एकटेपणाचे सावड माझे


ती वाटसुधा वाट तुझी पाहत आहे
आणि माझ्या आयुष्याची सकाळ तुझ्यासाठी थांबली आहे


कधी ग तुझी ती नजर माझ्या नजरेला मिळेल
आणि माझ्या मनाची अवस्था क्षणार्धात तुला कळेल


बस तू यावी परत हि आस माझ्या मनाला आहे
ह्रीदायातला हि ठोका, जणू तुझे नाव स्मरत आहे   


कवी- कल्पेश देवरे