Author Topic: माझाच तू वाटायचा रे (प्रशांत शिंदे)  (Read 1087 times)

माझाच तू वाटायचा रे
माझाच तू वाटायचा
तू साथ देशील
नेहमीच मला वाटायचं
असताना सोबत तू
मला एकटे कधीच न वाटायचं....

आता तर मी स्वप्नं पहायचे
तूझ्याच मिठीत जगायचं

वाटलंच नव्हतं
तूला प्रेम करताना माझी
ऐसी दैना होईल

तूझ्याचसाठी आसवे
ती माझ्याच नयनी येईल

माझाच तू वाटायचा रे
माझाच तू वाटायचा

काय ऐसे चूकले माझे
सोडूनी तू गेलास
आठवणींचे गाठोडं तूझ्या तू
अंगणी ठेऊनी गेलास....

सांग कैसे जगू मी तूजवीण
क्षूद्र झाले मी प्रेम न मिळाले
प्रेमात तूझ्या दू:खच दू:ख मिळाले

माझाच वाटायचा रे
मला फक्त माझाच वाटायचा..
-
© प्रशांत शिंदे
« Last Edit: April 11, 2012, 10:04:31 AM by prashant dadarao shinde »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...

« Last Edit: April 11, 2012, 11:34:19 AM by प्रशांत दादाराव शिंदे »