Author Topic: मी तुझ्यावर प्रेम केले (कल्पेश देवरे)  (Read 2611 times)

Offline Kalpesh Deore

 • Jr. Member
 • **
 • Posts: 88
 • Gender: Male
मी तुझ्यावर प्रेम केले

मी तुझ्यावर प्रेम केले
हे तुला कधी कळलेच नाही   
मी तुझ्यावर प्रेम केले
हे तुला कधी कळलेच नाही   

वाटेत तुझ्या मी नेहमी
वाट तुझी पाहत होतो
आठवणीत तुझ्या मी
नेहमीच तर रमत होतो
तिरकस नजरेने मी
तुला इशारे करत होतो

परंतु का कुणास ठाऊक
तो इशारा तुला कधी समजलाच नाही
मी तुझ्यावर प्रेम केले
हे तुला कधी कळलेच नाही   
मी तुझ्यावर प्रेम केले
हे तुला कधी कळलेच नाही   

वर्गात नेहमी तू
माझ्याकडे बघून हसत होतीस
Library मध्ये भेटल्यावर
"Hi" असेही म्हणत होतीस
भेटल्यावर सांगावे असा विचार मी केला होता

पण A.T.K.T. मुळे
वेळ कधी मिळालाच नाही
मी तुझ्यावर प्रेम केले
हे तुला कधी कळलेच नाही   
मी तुझ्यावर प्रेम केले
हे तुला कधी कळलेच नाही   

Result च्या दिवशी पुन्हा
आपण दोघे एकत्र आलो
घाबरलेल्या मनाने
एकमेकांना "Hello" म्हणालो
हाती Result पडताच
मी छानपणे नापास झालो 

कारण तुझाच विचार करत
अभ्यास मी करत राही 
मी तुझ्यावर प्रेम केले
हे तुला कधी कळलेच नाही   
मी तुझ्यावर प्रेम केले
हे तुला कधी कळलेच नाही   
 
कवी - कल्पेश देवरे


 


   

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...

Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422

Offline Kalpesh Deore

 • Jr. Member
 • **
 • Posts: 88
 • Gender: Male
धन्यवाद ..ज्योती जी ...

PINKY BOBADE

 • Guest
Fantastic.................

Offline Kalpesh Deore

 • Jr. Member
 • **
 • Posts: 88
 • Gender: Male

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):