स्वप्नपरी
निसर्ग रम्य स्थळी
सौंदर्य वतीचा वाश ,
जशी अवतरली जणु
स्वप्नपरी या जगात।
तिची ती निरागसता
आणि कोमल काया,
तिचा तो साधेपणा
मनाला लावतय माया।
तिच्या सहवासात नदी
ही तृप्त झाली असावी,
जणु चंद्राहून ही सुंदर
अशी तिची मूर्ती असावी।
त्या पाषाणाला ही वाटले असेल
त्याने कोणते असे केले पुण्य
म्हणोनि होऊनी विराजमान सौन्दर्यवती ने,
त्याचे जीवन केले धन्य।
अरविंद डोंगरे (अश्विन)