Author Topic: **** शिकलोय मी आता ****  (Read 924 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
**** शिकलोय मी आता ****
« on: June 17, 2015, 08:48:00 AM »
**** शिकलोय मी आता ****
.
शिकलोय मि आता तुझ्याविना
जगायला…
.
शिकलोय मि आता स्व:ताचाच
हात पकडुन चालायला…
.
शिकलोय मि आता रडु जरी आले
तरी स्व:ताचेच डोळे स्व:ताच्या
हाताने पुसायला…
.
शिकलोय मि आता ठेचकाळुन जरी
पडलो तरी स्व:ताच उठुन ऊभा
राहायला…
.
शिकलोय मी आता आयुष्याचा
पाया बांधायला…
.
शिकलोय मी आता तुझ्यासारखी
खोटी चेहरे ओळखायला…
.
शिकलोय मी आता २१ व्या
शतकातील मुलींना
ओळखायला…
.
शिकलोय मि आता एकटाच बसुन
एकटयाशी बडबडायला…
.
शिकलोय मि आता राग जरी
आला तरी स्व:तालाच
मनवायला…
.
शिकलोय मि आता स्व:ताची
काळजी स्व:ताच
घ्यायला…
.
शिकलोय मी आता न
सुटणारी कोडी
एकट्यानेच सोडवायला…
.
शिकलोय मि आता वेळेवर
जेवायला कारण आता
कुणी नाही जेवुन घे
म्हणायला …
.
शिकलोय मी आता मनात खुप
दु:ख असतानाही जगासमोर
हसायला…
.
शिकलोय मी आता मित्रांमध्ये
गप्पा मारायला…
.
शिकलोय मी आता सगळ्यांना
वेळ द्यायला …
.
शिकलोय मी आता झोपतानी
स्व:तालाच …
Good Night …
Love You …
Miss You… बोलायला…
.
सगळ काही शिकलो पण
नाही शिकलो तुला
विसरायला…
.
आणि…
.
शिकलोय मी आता तुझ्या
प्रत्येक आठवणीवर
कविता करायला...
.
माझ्या कवितांपैकी
एक कविता…
.
 

स्वलिखित - Prem Mandale (Alone Kils).

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref

Marathi Kavita : मराठी कविता