Author Topic: ** तू सोडून जातांना **  (Read 956 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
** तू सोडून जातांना **
« on: May 12, 2013, 12:48:36 AM »
** तू सोडून जातांना **
-------------------------------------
तू सोडून जातांना
तुझे सारे श्वास
माझ्या उरांत सोडून गेलीस
तुझा सारा गंध
भरला माझ्या नसानसांत
तू मात्र रिक्त होऊन गेलीस -----------
तू सोडून जातांना
तुझं सारं प्रेम
माझ्या ओंजळीत भरून गेलीस
काळजाचा घडा भरलाय
तुझ्या प्रेमानं काठोकाठ
तू मात्र रिक्त हाताने गेलीस ----------
तू सोडून जातांना
तुझ्या साऱ्या आठवणी
माझ्या जवळ सोडून गेलीस
प्रत्येक क्षण अन क्षण
जतन करून ठेवला मनात
तू मात्र रिक्त मनानंच गेलीस -----------
तू सोडून जातांना
माझं सगळं जगणं
बेधुंद करून गेलीस
तुझं प्रेम उरांत घेऊन
बेभान जगत असतो मी
तू मात्र प्रेम विसरून गेलीस ----------
तू सोडून जातांना
तूझा शब्द अन शब्द
माझ्या हृदयावर कोरून गेलीस
मी जपतोय अन जागतोय
तुझ्या प्रत्येक शब्दास
तू मात्र वचनांना कायमची विसरून गेलीस
तू मात्र वचनांना कायमची विसरून गेलीस .

                                                                   कवी : संजय एम निकुंभ , वसई
                                                                   दि . १२.५.१३  वेळ : १२ . १५ रा .

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
Re: ** तू सोडून जातांना **
« Reply #1 on: May 12, 2013, 08:01:08 PM »
Khup sundar...