Author Topic: ** वाटते आता पून्हा **  (Read 1166 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
** वाटते आता पून्हा **
« on: November 15, 2014, 10:22:01 AM »
*** वाटते आता पून्हा ***

धुदंलेल्या क्षणी पून्हा जाणिवाना पालवी ही नवी,
वेड्या जीवास का अजुन तूझ्या सोबतीची साथ हवी ;
वाटते आता हातात हात गुफंवूनी चालावे वाटेवरी,
स्वप्न माझे स्वप्नच राहिले शेवटी नसता सोबत तू खरी ...

ती आठवणीचे पिवळी पाने गळून पडली जणू शिशीरापरी,
अलगद झुळूक येता वार्याची बघ उडून चालले कसे दूरवरी ;
वाटते आता मला बहरुन यावे तू पून्हा वंसतापरी,
अन् प्रितीचा गंध हा नवा रुजवावा माझ्या अंतरी ...

क्षण ते सारे सरुन गेले उरले ना आता काही हाती,
क्षणात कसे तुटले आपुले ती जन्मातरीची नाती ;
वाटते आता मला मिठीत तुझ्या गुफूनं जावे,
अन् प्रेमरंगी आज तूझ्या मी चिबं चिबं भिजावे ...

पापण्यात उरले केवळ आसवाचे हे किनारे,
मनी पेटती अजूनही का भावनेचे ते निखारे ;
वाटते आता हवे ते तुझे भलमली स्पर्श सारे,
तनास स्पर्शणारे कोमल गारव्याचे ते शहारे ...


© कु. स्वप्नील चटगे
       (अबोल मी)
दि.15.11.2014
All Reserved Copyright © 2014-2015 Poem.
-------------------------------
« Last Edit: November 15, 2014, 12:21:25 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता