Author Topic: ** कधी कधी.. **  (Read 1072 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
** कधी कधी.. **
« on: November 16, 2014, 09:33:55 AM »
*** कधी कधी ***

कधी कधी वेडे मन का हरवते ,
कधी कधी एकटे एकटे झुरते ;
कधी कधी वाट हळवी चालताना,
का अशी पून्हा संपते कधी कधी ...

कधी कधी भावनेच्या सागरात बुडते,
कधी कधी शब्दाच्या लहरीत तरंगते ;
कधी कधी काव्यातील अबोल भाव,
न बोलता सारे जाणून घेते कधी कधी...

कधी कधी रेशीम स्वप्न उसवते,
कधी कधी आठवाचे क्षण सुलगते ;
कधी कधी नकळत का पून्हा असे,
अलगद हातून हात सुटते कधी कधी...

कधी कधी मन एकातात झूरते,
कधी कधी सावलीस बिलगते ;
कधी कधी रेतीसारखे का असे,
हातून पून्हा ढासळते कधी कधी  !!


**कु.स्वप्नील चटगे.**
(अबोल मी)
दि.16.11.2014.
« Last Edit: November 18, 2014, 09:22:30 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता