Author Topic: * एक वार काळजावरचा *  (Read 1348 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* एक वार काळजावरचा *
« on: July 22, 2014, 11:04:11 PM »
एक वार काळजावरचा इथे
दुखाप्रमाणेच थांबला आहे
सोबती कुणीच नाही माझा
तेव्हा तोच आपला आहे

डोळ्यांत अश्रुंचा प्याला तो
आता सुकण्यात आला आहे
दबलेल्या हुंदक्याला जाग यावी
तसा कळवळुन तो उठला आहे

ओठावरती आलेल्या त्या नावाला
ओठांवरच गडप केलं आहे
का सांगावे मी पुन्हा त्याला
जो संसारात रमला आहे

आठवणींच्या त्या काळ्या पडद्याला
आता रंग चढला आहे
जो विसरला होता केव्हाच मला
चेहरा आता तो समोर आला आहे...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob-7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता