Author Topic: * तुझा अबोला *  (Read 2845 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
* तुझा अबोला *
« on: August 24, 2014, 11:58:53 AM »
प्रत्येक प्रियकरासाठी..
-------------------------------
* तुझा अबोला *
-------------------------------
वेडी बोलना माझ्याशी,
कसला ग हा तुझा अबोला...
नाही ग कोणी तुझ्याविना,
समजून घेणारं या मनाला...

नको ग अशी रुसत जावूस,
वेडी तु सारखी पून्हा...
प्रेम केल फक्त तुझ्यावर
नाही केला कोणता गुन्हा...

अधिर अधिर मन हे माझे,
एकटेपणात हरवून जाते...
अन् त्या सन्नाट वाटेवरी,
पुन्हा वेडे एकटे भरकटते...

नको ग आता हा एकातं मला,
दे ना तु सोबतीचा हात...
ओढ तुझी लागे सारखी,
परतुन ये ना जीवनात...!!


 स्वप्नील चटगे.
            पार्टनर.

(दि.24/08/2014)
===========================
« Last Edit: August 26, 2014, 09:50:07 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता