Author Topic: * लग्नचिता *  (Read 1116 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* लग्नचिता *
« on: September 03, 2014, 01:37:46 PM »
* लग्नचिता *
एकीकडे तिचा लग्नसोहळा होता
दुसरीकडे सरणावर मी जळत होता
मिटल्या डोळ्यांनी मी तरीपण
तिला डोळ्यांत साठवत होता

नववधुच्या रुपात पाहुन तिला
मी मेल्यावरही पुन्हा मरत होता
काळीज तिच्या प्रेमात तर
देह आगीत जळत होता

देवाच्या मंदिरात तिने दिलेला
प्रत्येक शब्द आज खोटा ठरत होता
माझ्या प्रेमाचा ख-या अर्थाने
आज बाजार मांडला गेला होता

आगीच्या ज्वाळेत मी राख होत होता
काळजात घर केलेलं तिने
मी तिला वाचवत होता
लग्नचिता वर बसुन मी
पुन्हा तिच्यावरच प्रेम करत होता...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता