Author Topic: * दोघांचे शब्द *  (Read 1238 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* दोघांचे शब्द *
« on: September 21, 2014, 12:42:38 PM »
* दोघांचे शब्द *
रस्त्याने जातांना नजरेला नजर मिळत होती
दोघांमध्ये प्रेमाची ठिणगी कुठेतरी पेटत होती
तरीही दोघांची भावना एकमेकांना कुठे कळत होती
जणु परिक्षाच दोघांची आता नियती घेत होती

तरीही प्रेमाची पालवी दोघं मनात खुलत होती
कारण दोघंही एकमेकांना बघुन हसत होती
बोलायला हा ओशाळायचा व ती लाजत होती
कुणास ठाऊक कहाणी त्यांची कशी रंगणार होती

दोघांच्याही काळजात आता खळबळ माजली होती
विरहाची कळ आता कळवळुन उठली होती
तरीही दोघं माञ कशी शांत बसली होती
कोण बोलणार आधी जणु पैज लागली होती

एकदा दोघेही एकमेकांना अचानक भेटली होती
नियती जणु दोघांवर आज खुष झाली होती
कितीतरी वेळ दोघेही एकमेकांना फक्त बघतच होती
मनाची व्यथा त्यांची डोळ्यांनी डोळ्यांना कळत होती

नियती खरच किती निर्दयी बनली होती
कारण दोघेही बिचारी मुकी जन्मली होती
कळल्यावर दोघांनी मिळुन किती अश्रुं गाळली होती
जे ऐकायचं होतं एकमेकांकडुन ते शब्दच दोघं हरवुन बसली होती...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline ThunderFireDiamond

  • Newbie
  • *
  • Posts: 2
Re: * दोघांचे शब्द *
« Reply #1 on: September 22, 2014, 12:12:49 PM »
जो कोणी माझी प्रारंभ वेळ आणि स्थान सांगू शकता का? हे माझे पहिले उद्यम अडथळा काम कसे त्यामुळे खात्री नाही होईल