Author Topic: * माझी आठवण *  (Read 1107 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* माझी आठवण *
« on: February 13, 2015, 05:54:25 AM »
* माझी आठवण *
आली का ग कधी
माझी आठवण तुला
सांगना सये एकदातरी
आठवते का तु मला...?

एकच प्रश्न हा नेहमी
विचारतो मी स्वताला
खरच विसरली असशील
का तु मला....?

जेव्हा पण भेटतो मी
एकटाच बागेतल्या त्या बाकाला
कळवळुन मिठी मारतो ग
तुला समजुन त्या बाकाला...!

होतो खुपच जेव्हा रडवेला
टोचुन गुलाबकाटे हाताला
लपवण्याच्या प्रयत्न करतो
मी ह्रदयाच्या वेदनेला...!

बोलतो मग स्वताशीच
मी प्रेमवेडा तुझा दिवाना
आली का ग कधी
माझी आठवण तुला...?
कवी-गणेश साळुंखे. ( GS ) .
MOB-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता