* वेदनांच्या गावी *
कोणी भेटतो स्वप्नांच्या गावी
तर कोणी प्रेमाच्या गावी
आम्ही माञ भेटलो
एकमेकांना वेदनांच्या गावी
दुख तसं जुनंच होत
वेदना माञ नवीन होती
मी तिच्या ती दुस-याच्या
प्रेमात उध्वस्त झाली होती
विरहाचे दार खिडक्या एकांती
कोरडे उसासे अश्रुंच्या भींती
दुखावलेली मने तुटलेली नाती
याच आमच्या होत्या सोबती
तुला कधीच भेटनार नाही
असं ती म्हणाली होती
नशीबाने पुन्हा भेट आमची
वेदनांच्या गावी घडवली होती.
कवी-गणेश साळुंखे. ( GS ) .
Mob-7715070938