Author Topic: *#मोरनी घायाळ मी*#  (Read 522 times)

Offline Aishu

  • Newbie
  • *
  • Posts: 32
*#मोरनी घायाळ मी*#
« on: March 19, 2015, 08:31:35 AM »
*# मोरनी घायाळ मी #*

शोधु कुठे तुला मी, कुणा म्हणु सखा मी...
सागरा इतकं दु:ख कसं रे, सांग साठवु मनी मी...

शोधु कुठे तुला मी, मोरनी घायाळ मी...

का लावीलास जीव तू, या लाडक्या मैत्रीणीला...
सोडुन का गेलास असा रे, या सखीला...

इतकं दु:ख कसं रे, सांग साठवु मनी मी...
शोधु कुठे तुला मी, मोरनी घायाळ मी....

पंखांविणा तूझ्या नाही शोभा,  या मोरनीला..
नको रडुस आता म्हणून, समजावु किती या मनाला...

नसता तु माझ्यासवे, मोरनी घायाळ मी...
कोमेजल पाण्यावीणा सखी तुझी रे, मोगर्यावाणी मी...

शोधु कुठे तुला मी, कुणा म्हणु सखा मी..
शोधु कुठे तुला मी, मोरनी घायाळ मी....

जिथे कुठे असशील सख्या, ये परतुनी पुन्हा  रे...
आतुर आजून हे नैन, मिठीत मोहरत्या सखीला घेणा रे...

हेरतोय शिकारी सावज, होईल जीव माझा  पारद रे...
मग अंतिम त्या क्षणाला, नको तू सखी पुकारु रे....

शोधु कुठे तुला मी, कुणा म्हणु सखा मी....
सागरा इतकं दु:ख कसं रे, सांग साठवु मनी मी....

शोधु कुठे तुला मी, कुणा म्हणु सखा मी...
शोधु कुठे तुला मी, मोरनी घायाळ मी.....
मोरनी घायाळ मी.....

®ऐश्वर्या सोनवणे....
मुंबई....
दिनांक:-16-3-15
वेळ:-8:00pm.... 
(कॉपी करु नये कविता....कवितेखालील नाव ही काढु नये....)
(Rgstd poem)...

Marathi Kavita : मराठी कविता


Rajshri kahate

  • Guest
Re: *#मोरनी घायाळ मी*#
« Reply #1 on: March 19, 2015, 09:47:13 PM »
mi ek ghayal morani......?
very nice...