Author Topic: * तुझ्या विरहाच्या आठवणीत.... *  (Read 1018 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 232
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
तुझ्या विरहाच्या आठवणीत.....
 :'( :'( :'( :'( :'(

आज असाच एकटा बसलो होतो,
तुझ्या आठवणीत थोडं फसलो होतो..
वाटलं तुझ्यावरती प्रेम करुन,
नक्कीच कुठेतरी मी चुकलो होतो..!!

पहिलं मनात नसताना देखील,
नंतर तुझ्यावरच जीव जडला..
तुझ्या प्रेमात मला कळलंच नाही,
कधी हा प्रेमवेडा राजकुमार घडला..!!

बरीच स्वप्ने रंगवली,
तुझ्या सोबत सजवली..
तुझ्या प्रेमाने गं माझी,
झोप ही सखे उडवली..!!

तुझ्या प्रेमात काहीच कळत नव्हतं,
मन तुझ्याशिवाय कुठेच वळत नव्हतं..
तुझ्या प्रेमात मी वेड्यासारखा वागत होतो,
प्रत्येक देवाला मी तुला मागत होतो..!!

तुझ्या सोबतीचे ते दिवस,
जणु स्वर्गासारखे भासत होते..
शरीरातल्या प्रत्येक कणात,
मला तुझे रुप दिसत होते..!!

पण काळाने घाला घालावा,
तशी बात कानावर आली..
तु म्हणालीस प्रेम खोटं होतं,
आत्ता मी कुठे भानावर आली..!!


काळजात धस्स झालं,
हृदय अचानक फाटलं..
मला तु सोडून जाताना,
रक्त डोळ्यात साठलं..!!

वाटेतच सोडायचं होतं,
तर जवळ घ्यायचाच कशाला..
इतका इतका जीव लावून,
जीव तोडायचाच कशाला..!!

स्वप्नात देखील वाटलं नव्हतं,
तु हृदय माझं तोडशील..
जीवनाच्या या वाटेवर,
अर्ध्यातच मला सोडशील..!!

पण माहीतेय गं पिल्लू मला,
माझ्यापेक्षाही तु रडली असशील..
कोणी तुला पाहू नये म्हणुन,
कोपऱ्यात एकटीच बसली असशील..!!

साथ सोडण्याचं कारण,
नक्कीच काहीतरी मोठं असेल..
हृदय माझं म्हणतंय सखे,
प्रेम कधीच तुझं खोटं नसेल..!!

माझं काय घेऊन बसलीस,
मी एकटा कसाही जगेन..
आठवण तुझी आल्यावर,
एकटक फोटो तुझे बघेन..!!

तुझ्या सुखात माझं सुख लपलंय,
म्हणुनी सांगतो तु सुखी रहा..
आठवण आल्यावर सांगू नकोस,
पण तेव्हा थोडी मुकीच रहा..!!

मी जगत नाहीये स्वतःसाठी,
लिहतोय कविता तुझ्यासाठी..
शेवटची इच्छा मागतोय माझ्यासाठी,
आयुष्यभर सुखी राहशील ना पिल्लू.....
फक्त या प्रेमवेड्यासाठी...!!!
:'( :'( :'( :'( :'(
-
प्रेमवेडा राजकुमार

स्वलिखीत...
(धनराज होवाळ)
मो. 9970679949
फेसबुक. www.facebook.com/PremVeda143
« Last Edit: April 12, 2015, 01:01:49 PM by प्रेमवेडा राजकुमार »