Author Topic: * त्याच्या हस-या चेह-याला *  (Read 621 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 881
  • Gender: Male
* त्याच्या हस-या चेह-याला *
जा तु आता जात आहेस तर
मी अडवणार नाही तुला
जाणीव होईल कधीतरी चुकल्याची
तेव्हा कळेल उगाच छळले मला

आज तु आहेस समर्थ
सावरायला स्वताला
उद्या बेजार झाल्यावर
आठवणार मला

म्हणशील सदा न कदा
हसवायचा मला
आता सोडलंय एकट
मीच त्याला

कसा राहत असेल
तो आता एकटा
करत असेल का कुठल्या मुलीवर
विश्वास तो आता
इतके दुख देउन आली आहे मी त्याला

तरी एका शब्दानेही वाईट बोलला नाही मला
उगाच विश्वास त्याचा मी तोडला
रडवुन आली मी त्याच्या हस-या चेह-याला
त्याच्या हस-या चेह-याला.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938