Author Topic: * तुला रडवणार *  (Read 977 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 881
  • Gender: Male
* तुला रडवणार *
« on: July 10, 2015, 06:19:02 PM »
* तुला रडवणार *
तुझ्या प्रेमाचा हिशोब आज
मी चुकता करणार आहे
ओल्या जख्मांच्या वेदना सा-या
न्यायाच्या पारड्यात टाकणार आहे

जितकं छळलयस तु आजपर्यंत
पारडं तितकच खाली जाणार आहे
एक एक वेदना माझी
तुझी कहाणी सांगणार आहे

विश्वासाच्या नात्याला अविश्वासानं तोडलस
निर्दोषा जीवाला गुन्हेगार ठरवलंस
केला नाही जो गुन्हा कधी
त्याची शिक्षा भोगायला लावलस

तु खर प्रेम केलंस ना
म्हणुन मला एवढच ओळखलस ?
आता काहीच नाही बोलणार
रोज तुला माझ्या कवितांनी
फक्त अश्रुं आटेपर्यंत रडवणार.
कवी-गणेश साळुंखे.

Marathi Kavita : मराठी कविता