Author Topic: * प्रेम तुझ्यावरच करणार *  (Read 1283 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* प्रेम तुझ्यावरच करणार *

तुझ्या नजरेत वाईट आहेना
मग आता वाईट बनणार
खोटं वाटतंना माझ बोलण
आता काहीच नाही बोलणार
पण प्रेम तुझ्यावरच करणार

स्वार्थी तु झालीस आता
ती गोष्ट मीपण शिकणार
रडुन रडुन दमलो मी
आता हसुन हसुन रडणार
पण प्रेम तुझ्यावरच करणार

जे तु ऐकल नाहीस
ते सा-या जगाला ऐकवणार
माझ्या प्रेमाची चिता मी
माझ्या याच हातांनी रचणार
पण प्रेम तुझ्यावरच करणार

दगडाच्या ह्रदयाला तुझ्या मी
माझ्या अबोल्याने पाझर फोडणार
जे तु वागलीस माझ्यासोबत
त्याचा पश्चाताप तुला होणार
पण प्रेम तुझ्यावरच करणार
फक्त तुझ्यावरच करणार.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Lilopoppa

  • Newbie
  • *
  • Posts: 2
    • sbobet
Re: * प्रेम तुझ्यावरच करणार *
« Reply #1 on: July 28, 2015, 01:17:04 PM »
Sometimes, something unexpected always happens. I think we have to be prepared at all times.