Author Topic: * दुसरं कुणी *  (Read 1091 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 884
  • Gender: Male
* दुसरं कुणी *
« on: August 13, 2015, 11:36:59 AM »
* दुसरं कुणी *
दुसरं कुणी तरी आलंय पुन्हा
प्रेमाच दान माझ्याकडे घेउन
कस सांगाव आता त्याला मी
की आस्तित्व गेलंय लुटुन

एकदा खेळुन खेळ हा फसलाय
गेलंय कुणीतरी अस छळुन
तरीही आज तो मनात राहतोय
जो गेलाय कधीच मला विसरुन

त्याने जरी तो गुन्हा केलाय
मला प्रेमात उध्वस्त करुन
मी दुसरा गुन्हा का करणार
त्याची जागा दुस-याला देऊन

काळीज प्रश्न विचारतच राहतंय
का ठेवल्याय तिच्या आठवणी जपुन
एकच उत्तर नेहमी त्याला मिळतंय
कधीतरी येणार ना ती परतुन ?
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Sandicob

  • Newbie
  • *
  • Posts: 2
    • จีคลับ
Re: * दुसरं कुणी *
« Reply #1 on: August 17, 2015, 06:17:55 PM »
You helped me to do everything better.