Author Topic: सोना फक्त तुझ्यासाठी..* तुझ्याविना *  (Read 1186 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
सोना फक्त तुझ्यासाठी माझी ही कविता...
* तुझ्याविना *
नाही कोणी ग
सये माझं तुझ्याविना
कसं पटवुन देऊ
जीव तुटतोग तुझ्याविना

एकटा मी अजुनही
आहे ग तुझ्याविना
येशील कधी परतुनी
वेडा झालो तुझ्याविना

सुना सुना झाला
सारा बाग तुझ्याविना
वसंतातही बघ उमलेना
एकही फुल तुझ्याविना

पडता पाऊस अंगावरी
लागली आग तुझ्याविना
विरहाची आग ही
काही विझेना तुझ्याविना

सोड रुसवा सखे
मी ही अबोलच तुझ्याविना
सांग एकदाच तु
जाईल मरुनी तुझ्याविना.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938