Author Topic: * मनातले प्रेम *  (Read 1122 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 884
  • Gender: Male
* मनातले प्रेम *
« on: September 28, 2015, 11:18:15 AM »
माझी एक जुनी कविता

* मनातले प्रेम *
मनात माझ्या असते सखे बरेच काही
वर्षानुवर्षे लपलेले सांगावयाचे असे काही
सामोरी येताच तु विसरतो सारे काही
कसे सांगावे तुला तेच कळत नाही

आठवणीत दिवस जातो राञ संपत नाही
एकटेपणास माझ्या साथ तुझी मिळत नाही
कित्येकदा रंगल्या गप्पा आपल्या अशा काही
पण मनातले प्रेम कधी बोललोच नाही

तुझे हसणे तुझे लाजणे जपले सारे काही
अश्रुंना माझ्या कोणी पुसण्यास आले नाही
दुख राहिले मनात चेह-यावर ते आले नाही
प्रेम माझे तुला कधी कळणार की नाही

तुझ्या आवडी निवडीने वागतोय मी
मला काय आवडते तु विचारलेही नाही
प्रेमाची अबोली हाक तु कधी ऐकलीच नाही
डोळ्यात लिहलेले प्रेम कधी वाचलेच नाही

एक दिवस निघुन जाईल दुर असा काही
की पुन्हा कधीच परतुन येणार नाही
त्याआधीच समजुन घे मला असे काही
की मिठीतुन तुझ्या सुटावेसे वाटणारही नाही.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938

Marathi Kavita : मराठी कविता


खुशाबराव लोनबले

  • Guest
Re: * मनातले प्रेम *
« Reply #1 on: September 29, 2015, 11:52:26 AM »
छान!