Author Topic: * माझी ओळख *  (Read 995 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 882
  • Gender: Male
* माझी ओळख *
« on: October 04, 2015, 09:41:53 PM »
* माझी ओळख *
मीच शोधतोय माझी ओळख
माझं मलाच समजल नाही
व्यक्तीपरत्वे बदलली माझी ओळख
तरीही कोणालाच कळलो नाही

कुणी हळव्या मनाचा तर
कोणी शब्दांचा जादुगार म्हटलं
काहींनी तर अहंकारी म्हणुन
माझं नावही बदलुन टाकलं

काहींना मी प्रेमकवी वाटलो
तर काहींना वेडाच वाटलो
मग मी कधी त्यांच्यावर
तर कधी स्वतावरच हसलो
           मग माञ
कधी मी उधाणलेला सागर
तर कधी उफाळलेला लाव्हा
ही कोणती आग धुमसतेय
जी लागली माझ्या जीवा
            कारण
स्वार्थापोटी मी सगळ्यांचा होता
पण माझ्यासाठी कुणीच नव्हतं
मैफिलीच्या मैफिली रंगवल्या तरीही
आपलंस कोणी भेटलच नव्हतं.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938

Marathi Kavita : मराठी कविता