मित्र/मैत्रिणींनो,
आज मी तुम्हाला, एक विरह कविता-गीत ऐकवितो. "दीवाना प्यार तेरा, दिल मेरा चुराने लगा, रातों को जगाने लगा"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस सप्टेंबर महिन्याची ही पावसाने विश्रांती घेतलेली, आणि छान, साफ, स्वच्छ, चमकदIर ऊन पडलेली, रविवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.
--मूळ हिंदी गाणे-( दीवाना प्यार तेरा, दिल मेरा चुराने लगा, रातों को जगाने लगा )
----------------------------------------------------------------------
"प्रिया, तू चोरी केलंस माझं मन, तुझ्या प्रतीक्षेत झरू लागलेत माझे नयन"
---------------------------------------------------------------
प्रिया, तू चोरी केलंस माझं मन
तुझ्या प्रतीक्षेत झरू लागलेत माझे नयन
तुझ्यावर प्रेम केलं ही माझी चूक झाली का ?,
ही चूकच भोवतेय का मला आज, साजन ?
प्रिया, तू चोरी केलंस माझं मन
तुझ्या प्रतीक्षेत झरू लागलेत माझे नयन
इतका कसं साजणा तुझं वेड प्रेम,
तुझ्या या दीवIण्या प्रीतीत जळतंय माझं तन बदन
माझ्या जीवनात तू सहज आलास, मला तू प्रेमाने दिलासा दिलास
माझं मन तू चोरून नेलस, तुझ्या प्रेमात तू मला फशी पIडलस
तुझ्या प्रेमाला मी बहकत गेले, पाठी पाठी तुझ्या येत गेले,
रात्र रात्र माझ्या डोळ्याला डोळा नाही, असला कसला रोग तू मला दिलास ?
आता तर झोप साफ उडूनच गेलीय, मला जागरणाची शिक्षाच जणू मिळालीय
या कुशीवरून त्या कुशीवर वळत, रात्र पाहता पाहता उलटून गेलीय
तुझेच स्वप्न मी जागेपणी पाहतेय, पंख लावून भुर्रकन ते उडूनही जातेय,
पहाटेस, तुला स्वप्नांत भेटता भेटता, पक्ष्यांची किलबिलही सुरु झालीय
पुन्हा फिरून दिवस तेच, जे घडत होतं रात्रीस हेच
पुन्हा पुन्हा तुझी आठवण येतेय, आता मला पडलाय पेच
तुझ्या वेड्या प्रेमात मीही पागल झाले, माझा चित्तचोर आहेस तू,
मला कळत नाहीय, माझ्या मनाची प्रेमात का चाललीय रस्सी-खेच ?
इतकं तू मला वेड केलस, इतकं तू मला तुझ्या नIदी लावलस
पाहता पाहता तुझ्या प्रेमात पडले मी, इतकं तू मला भुलवलस
तू कुणी जादूगार तर नव्हे ना, तुझं गIरुड माझ्यावर पडलं, आणि सारं घडलं,
पाहता पाहता तू मला तुझ्या जाळ्यात ओढलस, माझं मन-हरण केलस
प्रिया, तू चोरी केलंस माझं मन
तुझ्या प्रतीक्षेत झरू लागलेत माझे नयन
माझ्या मनाला किती समजावलं मी,
पण तेहि अनसून करून राहील ऐकून
प्रिया, तू चोरी केलंस माझं मन
तुझ्या प्रतीक्षेत झरू लागलेत माझे नयन
तुला चांगलीच जमतेय प्रिया मनाची पारख,
तुझ्या लIघवी बोलण्याला मी तुझ्या प्रेमात अडकले चुकून
होश येतI येत मला होतं कळलं, माझं मन तुझ्या प्रेमात होतं अडकलं
तुझे ते मोहिनी घालणारे होते शब्द, बेहोष होता होता मला होतं कळलं,
तुझ्या चIहतचा रंग माझ्यावर चढत जात होता, ही चIहत कोणती होती,
तुझा एकमेव संग, मला प्राप्त करण्याचा अनोखा ढंग, मी तुला होतं ओळखलं
तो तीर तुझ्या धनुष्यातून सुटला होता, निशाण्यावर जाऊन लागला होता
माझे हृदय विद्ध होता होता, तो परतुनी तुझ्या भात्यात जाऊन बसत होता
त्या प्रेम-बाणाने बंबाळ झालेले माझे हृदय, तुझ्या मनाचा वेध घेऊ लागले,
क्षत विक्षत झालेले माझे नाजूक दिल, तुझ्या नावाचा पुकारा करीत होते
माझं दिसतं नसलेलं प्रेम तू पाहिलं होतंस, माझं अव्यक्त प्रेम तू जाणलं होतंस
डोळ्यांच्या पापण्यात मी ते जोपासलं होत, डोळे बंद करून मी ते लपवलं होतं
तुझी नजर जरी चुकवत असले, तरी माझ्या हावभावातून ते कळत होतं,
माझ्या झुकत्या नजरेतून, माझ्या श्वास निश्वासातून तू ते बरोबर ओळखलं होतं
मनकवडाच आहेस तू प्रियकरI, तुला ते सारं समजलं होतं
माझी थरथर, माझं कंपन, माझी चलबिचलता यातून ते उकलत होतं
प्रेम लपविता येत नाही खरंय, तू ते माझ्या चंचल अदेतून अचूक जाणलं होतं,
तुझ्या प्रेमाचा रंग माझ्यावर खुलत होता, यासाठी का आरसI हवा होता ?
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.09.2023-रविवार.
=========================================