Author Topic: अ आ इ ई नको मास्तर abcd शिकवा  (Read 597 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
खेड्यापाड्याच्या शाळेत दिसे, विद्यार्थ्याचा रुसवा
अ आ इ ई नको मास्तर, ABCD शिकवा !

मराठी आमची मातृभाषा, त्याचा आम्हालाही अभिमान
पण द्याहो मास्तर थोडं इंग्लिश स्पीकिंगचेही ज्ञान !

बापुला आम्ही भेटलो,आता अब्राहम लिंकनला  भेटवा
अ आ इ ई नको मास्तर ABCD शिकवा !

रामायण महाभारत आम्ही, आजीकडेच शिकलो
रावण कुंभकर्णचा विचार करीत,रोजच आम्ही पकलो

राम कृष्ण बघितले आता, थॉमस एडिसन ही दाखवा
अ आ इ ई नको मास्तर ABCD शिकवा !

बाप आमचा शेतकरी, पिकवतो जमीन काळी
इंग्रजीच्या अभावामुळे, जातो रोजच त्याचा बळी

काळ्या आईच्या पोटी मास्तर, बिल गेट्सची टेक्नॉलॉजी शिकवा
अ आ इ ई नको मास्तर, ABCD शिकवा !

चुलता माझा आर्ट बी. कॉम, त्याच्या काहीच नाही म्होरं
करतो शेती, काढतो शेण, रोजच वळतो ढोरं !

गावाबाहेर पडण्या मास्तर, आम्हांला तरी इंग्लिश शिकवा
अ आ इ ई नको मास्तर, ABCD शिकवा !

इंग्लिश मीडियम आमच्या खेड्यात, करा कुणीतरी  खुलं
शिकून सवरून मोठं होईल, शेतकऱ्यांचही मुलं

कळकळ आमच्या जीवाची मास्तर, तुम्ही सरकारला दाखवा
अ आ इ ई नको मास्तर, ABCD शिकवा !


संजय बनसोडे
9819444028