मी तिला फोन केला, मेसेज केला
कधी रिप्लाय आले
कधी रिप्लाय नाही आले
पण ती नाही मिळाली
ती कधीही नव्हती.
मी तिला रस्त्यात, घरात, सकाळी, रात्री, उन्हात, पावसात,
ह्याच्यात, त्याच्यात, सगळ्यात पाहिलं
बघून हसलो
हात केला
स्पर्श केले
तिने कधी स्पर्श केला, कधी नाही
पण ती नाहीच मिळाली
ती कधीही नव्हती.
मी खूप प्रेम केलं तिच्यावर
हळूवार
कचाकच
शरिराच्या वळणावळणाला हात घातला
खोबणीखोबणीत जीभ फिरवली
ऑर्गॅझम्पर्यंत
पण ती नाही मिळाली
ती कधीही नव्हती
मग मी हिंस्त्र झालो.
तिला थोबाडलं
मनगट पिरगाळलं
म्हणालो बिच.
म्हणालो होअर.
म्हणालो फक् ऑफ
ती ही म्हणाली तसंच.
पण ती कधीही नव्हतीच; जिथे ती ’आहे’ असं मला ती म्हणायची
किंवा जिथे ती आहे असं तिला वाटायचं
तिचे अकाऊंट्स हॅक् केले
मीच प्रकट व्हायला लागलो
तिच्या प्रोफाईल मधून
तर ती तिथेही नाही मिळाली
तिच्या मेलबॉक्स मध्ये घुसून
पत्रांचे ढिगारे उपसले
तिथेही नाही.
ती फ्लॅटवर आहे असं ऐकलं
ती तिथेही नव्हती
ती जुन्या घरी गेलीए म्हणे
तिथे नव्हती
घरी गेलीए काही दिवस
तिथेही नसेलच
तिच्या एक्स् कडे विचारलं
’डोन्ट् नो. मी कधीच विसरलोय तिला.’
तो सहज वाटेल असं ठासून बोलला.
पण मला माहितीए ’ती आहे’ असंच त्याला वाटतंय.
तो रोज तिला बघतो फोटो, गाणी, स्मरण, प्रोफाईल, चॅट मध्ये.
पण खरं तर ती नाहीए.
तिचे कट्टर मित्रमैत्रिणी म्हटले ’ती आहे आमच्यासोबत’
पण ती नाही मिळाली तिथेही
ती अमेरिकेत जाईल
तिथेही नसेल
तिला नवीन नाती फुटतील
तिथेही ती नसेल
अशा प्रकारे ती कुठेही नसतेच हे मला कळत गेलेलंय
सो मी माझ्या घरातलं, आयुष्यातलं, भूतकाळातलं
तिचं अस्तित्व आता नाकारतोय
’ती आहे आहे’
’ती होती होती’
असं जे मला वाटायचं
ते खोटं होतं.
तिचं असणं नसणं म्हणजे
तिचं नसणंच अस्तं.
ती नाहीचंय
ती नव्हतीच
आता मोकळं मोकळं वाटतंय
ती कधीही नसतेच